केंद्र सरकारची पीएमश्री योजना राज्यात लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

0
28

मुंबई : राज्यातील सर्व शाळांचे पूर्ण स्वरूप बदलण्याबाबतचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील शाळांचे पूर्ण स्वरूपच बदलणार असून केंद्र सरकारची पीएमश्री योजना राज्यात देखील लागू करण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार आहे.

केंद्र सरकारने सप्टेंबर २०२२ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशात १४ हजार ५९७ शाळा सुरु करण्यात येणार आहे. आदर्श शाळा म्हणून या शाळा ओळखल्या जातील असे सांगितले जात आहे. देशातील १८ लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया’ महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रीमंडळामध्ये खलबते झाली.

अशी आहे पीएमश्री योजना…
या शाळेत नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येईल.
शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठीही उपायोजना सुचवल्या जातील.