बाजार समिती निवडणूकीत व्यापारी व अडत्यांना मतदानाचा अधिकार द्या – आ. रहांगडाले

0
39

तिरोडा,दि.02ः- कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रात शेतकऱ्यांसोबत व्यापारी अडत्या हेसुद्धा महत्वाचे घटक असल्याने त्यांनाही मतदानाचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी आमदार विजय रहागंडाले यांनी शासनाकडे निवेदनातून केली आहे.रहागंडाले यांनी दिलेल्या निवेदनात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम १३/१ ब नुसार बाजार समिती क्षेत्रात व्यापारी अडते म्हणून मतदानाचा अधिकार बजावण्याकरीता व्यापारी अडते म्हणून काम करण्याकरिता दोन वर्षे मुदतीची अनूज्ञपती असल्यास मतदार म्हणून व्यापारी गट मतदार यादीत नाव नोंदणी करण्यात येते. याउलट सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायत गटांमध्ये निवडून येणाऱ्या व्यक्तीस पाच दिवसाआधी मतदार म्हणून समाविष्ट करण्याची तरतूद आहे.याच नियमाला अनुसरून दिनांक ३१/०३/२०२३ पर्यन्त नोंदणी झालेले सर्व व्यापारी अडते,यांना मतदार म्हणून नोंदणी करण्याकरिता आधिकार देण्याचे आदेश काढण्यात यावे असे निवेदन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.