दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जवान शहीद

0
8
श्रीनगर, दि. 11 – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरु असलेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. हंडवारा जिल्ह्यात ही चकमक सुरु आहे. रात्रीपासून सुरु असलेली ही चकमक अद्यापही सुरु आहे. हंडवारा परिसरातील जंगलात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने दहशतवादी विरोधी ऑपरेशन सुरु केलं होते.
चकमकीदरम्यान जखमी झालेल्या जवानाला जम्मूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक होण्याची या महिन्यातील ही तिसरी घटना आहे.