नागपूर: नागपुरात शुक्रवारी रात्री चार तासात तब्बल १०० मिमी पावसाची नोंद झाली असून पाऊस अद्याप सुरूच आहे. संपूर्ण शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सकाळी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली व पूरपीडितांना तत्काळ मदतीच्या सूचना दिल्या.फडणवीस यांनी यासंदर्भात टि्व्टट केले आहे. त्यात ते म्हणतात “ नागपुरात काल रात्री मुसळधार पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला त्यामुळे काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. अवघ्या चार तासात १०० मि.मी. पाऊस झाल्याची माहिती मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. नागपूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहचले आहेत. तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक तर तर एसडीआरएफच्या दोन चमू बचाव कार्यात तैत करण्यात आल्या आहेत, सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवूनआहे.”
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. शेकडो घरात पाणी शिरले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे ३ वाजता ही घटना घडली.शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता. रात्री पावसाची तीव्रता अधिक वाढली. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. तलावाच्या एका टोकाला असलेल्या विवेकानंद पुतळ्याजवळ तलावाचा विसर्ग पॉईंट आहे. तेथून वेगाने पाणी प्रथम रस्त्यावर आणि नंतर रस्त्यालगतच्या अंबाझरी लेआऊटमधील घरात शिरले. रात्री ३ ते ३:३० च्या सुमारास परिसरात एकच वस्तीमध्ये एकच गोंधळ उडाला. याच वस्तीत अंधाची शाळा आहे.तेथे पाणी शिरले. मुलांना पहिल्या माळ्यावर हलवण्यात आले.
महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी पोचहचली असून लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. कार्पोरेशन कॉलनी ,कस्तुरबा नगर, डागा ले आऊट, सुभाष नगर येथील पाचशे लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे. तीन बोटी घटनास्थळी आले बोटीच्या सहाय्याने लोकांना घराच्या बाहेर काढले जात आहे. शंकर नगरमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले.मोरभवन परिसरात पाणी शिरले आहे. बसेस अर्ध्या पाण्यांत असून तिथून लोकांना बाहेर काढणे सुरू आहे.