शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी त्वरित द्या- रेखलाल टेंभरे

0
5

गोरेगाव,दि.23- विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघटना गोरेगाव तालुका संघटनेकडून संस्थेच्या शेतकरी सभासदांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भव्य मोर्चा काढून सहकार मंत्री महाराष्ट्र शासन यांना तहसीलदार गोरेगाव मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत बाकी उर्वरित कर्जमाफी बाकी राहिलेली उर्वरित राहिलेली कर्जमाफी शेतकरी सभासदांचे थकीत कर्ज राशी व शेतकरी प्रोत्साहन राशी लवकरात लवकर देण्यात यावी. जेणेकरून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे आर्थिक भूदंड कमी होईल व महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आले. पण थकीत व उर्वरित शेतकऱ्यांची शासनाकडील रक्कम शासनाने त्वरित द्यावे आदी १० मुख्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक व सभासद शेतकरी यांचे उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला.तहसीलदार गोरेगाव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थितांना रेखलाल टेंभरे संचालक जीडीसीसी बॅंक यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.तहसीलदार गोरेगाव यांनी संस्थेच्या व शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्याचे आश्वासन दिले.

निवेदन देतांना रेखलालभाऊ टेंभरे (डायरेक्टर जीडीसीसी बॅंक गोंदिया तथा संयोजक वि.का.सेवा सह.संस्था संघटना), डोमाजी बोपचे (जिल्हा अध्यक्ष वि.का.सेवा सह.संस्था संघटना), डॉ. योगेश हरिणखेडे (कोषाध्यक्ष वि.का.सेवा सह.संस्था संघटना), जगदीश येरोला (सभापती खरेदी विक्री गोरेगाव), योगराज पारधी (माजी सभापती कृ. उ. बा. स. गोरेगाव), प्यारे गौतम, बाबा कटरे, किशोर ठाकरे, पटले जी, अंकुश बघेले, योगेश पारधी, माणिक गौतम, मुन्ना बिसेन (पाथरी), शालिकराम कोल्हे (चिचगाव), डेमेंद्र ठाकूर (पुरगाव), व अन्य ४० च्या वर सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते.