अपघातातील मृतांची संख्या ५, झारखंडमधील मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

बुलढाणा : नागपूर – मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या ५ वर पोहोचली आहे.एका आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडल्याने ही भीषण दुर्घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे आज सोमवारी सकाळी ही घटना घडली. रस्त्याच्या बाजूला खाली जमिनीवर मजूर झोपलेले असताना ट्रक क्र. पिबी-११/ सिझेड४०७४ च्या चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून त्यांना चिरडले. यातील मृतांची संख्या ५ झाली असून ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मलकापूर येथे उपचार सुरु आहेत.प्रकाश मकु घांडेकर, (२६), पंकज तुळशिराम जांबेकर (१९), अभिषेक रमेश जांबेकर (१८ ), राजाराम बुडा जांभेकर (३०) सर्व रा. मोरगड, ता. चिखलदरा जि.अमरावती आणि गुणीराम भोगाराम (३५, रा. मतवली ता. जि. पलामू, झारखंड) अशी मृतांची नावे आहेत, तर अक्षयकुमार सी कुमार राम (१८), सतपाल कुमार मानसिंगराम (२२), मेहसराम रवी (६५), आशिष कुमार राम (१८) सर्व रा. मतवली, ता. जि. पलामू, झारखंड आणि दीपक पंजी बेलसरे (२३, रा. मोरगड, ता. चिखलदरा, जि.अमरावती)यांच्यावर मलकापूर येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.