गोंदिया,दि.03- गोंदिया तालुक्यातील महालगाव येथील निवासी असलेले व भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान लोधी देवीप्रसाद राधेलाल (मुन्ना) लिल्हारे (वय 41) यांचे आज दि.03 आक्टोंबरला सकाळी 8.30 वाजेदरम्यान हिमाचल प्रदेशातील सिमला येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.कर्तव्यावर असताना देवीप्रसाद लिल्हारे शहिद झाले असूून एक महिन्यात गोंदिया जिल्ह्यातील लोधी समाजाचे दोन विरपुत्र वीरगतीला प्राप्त झाले आहेत.देवीप्रसाद यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.