तिरोडा,दि.03ः-आपत्ती व्यवस्थापनाचा तयारीचा अभ्यास करण्या साठी अदानी पॉवर प्लांट मध्ये मोक ड्रिल संचलित करण्यात आली.हायड्रोजन केमिकल प्लांट जवळ गवताळ आग लागल्याचा संदेश प्लांट मधील मुख्य नियंत्रण केंद्रात मिळाला.तातडीने हा संदेश फायर कंट्रोल रूम तसेच अदानी प्लांटचे आपत्ती नियंत्रण मुख्य अधिकारी याना देण्यात आले. मोठा सायरन वाजवण्यात आला ,सर्व कामगार आस्सेम्बली पॉईंटवर धावत पोहचले.परस्थिती हाताळण्यासाठी तिरोडा पोलीस स्टेशनला लगेच कळवण्यात आले. तातडीने फायर मेन टीम , पोलीस अधिकारी तिरोडा मुख्य आपत्ती नियंत्रण अधिकारी ,सुरक्षा अधिकारी ,सेक्युरिटी प्रमुख आणि टीम ,ऍम्ब्युलन्स ,फायर टेंडर सह हायड्रोजेन प्लांटला पोहचले आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचे पूर्ण निरीक्षण करण्यात आले. आग विझवण्याचाही अभ्यास तयारी तत्परता याची पडतालणी घेण्यात आली.आग विझवण्याची रंगीत तालीम करण्यात आली.सुरवातीला माहित नव्हते इथे मॉक ड्रिल आहे. त्या मुळे थोडे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते लगेच ऑल क्लिअर सायरन देऊन मॉक ड्रिल संपल्याचे जाहीर करण्यात आले.या मॉक ड्रिल मध्ये यशस्वी प्रतिसाद देण्यात आला. संपूर्ण कवायत यशस्वी होण्या साठी अदानी प्लांटचे मुख्य अधिकारी कांती बिस्वास ,मेन्टेनन्स हेड श्रीराम पिंपळीकर ,तिरोडा पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी देविदास कठाडे , जोगदंड साहेब आणि सहकारी ,तसेच अदानी प्लांट सेक्युरिटी अधिकारी राजेंद्र मुरारी ,सुरक्षा अधिकारी शशिकांत बोधनकर ,फायर विभागाचे मुदित खरे ,विकास वर्मा ,सुहास वाकोडकर ,संतोष शर्मा ,धीरज शिंदे यांनी पुढाकार घेतला.