ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःला म्हातारे समजू नये- ऍड. लखनसिंह कटरे

0
4

गोंदिया – वय वाढत जाऊन कधी ना कधीं वृद्धत्वाकडे वाटचाल करावी लागेल परंतु मनात आपण वयाचे ६० वे वर्ष झाले की आता आपण म्हातारे झालो, आता सर्व संपले , आपण काहीच करण्याजोगे राहिलेलो नाहीत असे समजतो. असे कधीही मनात येऊ देऊ नका व स्वतःला म्हातारे झालो अशी समज मनातून काढून टाका , असे आवाहन गोंदिया जिल्ह्यातील ज्येष्ठ विचारवंत व गोंदिया जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा समितीचे कार्याध्यक्ष लखनसिंह कटरे यांनी केले . ते ” ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते
सामाजिक न्याय विभाग व ज्येष्ठ नागरिक सेवा संघ गोंदियाचे वतीने पंचायत समिती गोंदियाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुणेशभाऊ राहंगडाले , सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, महिला अर्बन को- ऑप बँकेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी नासरे वरिष्ठ समाजसेवक भरत क्षत्रिय , इंजि. संजय कटरे , अनुप शुक्ला व प्रभाकर वऱ्हाडे तसेंच बहुसंख्येने ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील ९९ वर्षीय  बाबुलाल गजनलाल ठाकुर ( से.नि. dysp रा. बटाणा,मुंडीपार) , ८३ वर्षीय मधुकर नारायणराव नखाते , ८६ वर्षीय प्रा. धनराज ओक , ८५ वर्षीय श्रीमती निलाताई ढोक , ९४ वर्षीय  एच. एम. ठाकूर यांचा शाल , श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव दुलीचंद बुधे यांनी केले व सर्वांनी ज्येष्ठ नागरिक म्हणून एकमेकांच्या सुख व दुखात सहभागी होण्याचे व शासकीय योजनेचा वापर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले . कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. मंजुश्री देशपांडें यांनी केले, तर आभार इंजि. संजय कटरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलीप देशमुख , मधुकर चौरागडे, विठ्ठलरावं भरणे , श्रावण सिंगनजूडे , मनोहर लाडेकर ,शरद क्षत्रिय, सिद्धार्थ मेश्राम , तुळशीदास झंझाड, अनुप शुक्ला,लिलाधर पाथोडे,पुरूषोत्तम मेंढे,रामेस्वर लिलारे,सजंय कटरे,सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले