“सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून पत्रकारांच्या घरी छापे, अटकसत्र,”-योगेंद्र यादव

0
5

नागपूर : पत्रकारांनी सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून मोदी सरकारने त्याच्या घरी धाडी घातल्या, त्यांना कित्येक तास ताब्यात ठेवले. आणि काहींना अटक केली, असे स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्रीय तपास यंत्रणांनी ज्या पत्रकारांना अटक केली होती, ते सर्व सरकारला कठोर प्रश्न विचारणारे आहेत. आम्हाला प्रश्न विचाराल तर तुमच्याशी सरकार असेच वागेल, असा संदेश सरकारने या अटकेतून दिला आहे. ही अटक पत्रकारितेवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. अश्या प्रकारे पत्रकारितेची मुस्कटदाबीचा तीव्र निषेध करतो, असेही यादव म्हणाले.