सुनील केदार कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष

0
10

नागपूर : आमदारकी रद्द झालेले सुनील केदार आज करागृहाबाहेर आले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यांच्या समर्थकानी प्रचंड घोषणा देत नागपूर मध्यवर्ती कारागृहापासून मिरवणूक काढली. त्यामुळे अजनी चौक ते राहाटे कॉलनी चौक वाहतूक बंद करण्यात आली होती.नील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जामीन मंजूर केला. केदार यांची आज दुपारी सुटका होणार असल्याने कार्यकर्ते आपल्या नेत्याचे कारागृहाबाहेर स्वागत करण्यासाठी मोठया संख्येने आज सकाळपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर गोळा झाले होते.नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक प्रकरणात ट्रायल कोर्टने केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. सुनील केदार यांनी यानंतर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, मात्र तिथे त्यांच्या पदरी निराशा आली. सर्व बाबींचा विचार करून सुनील केदार यांना जामीन मंजूर केला जात आहे, असा आदेश न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने दिला. सुनील केदार यांना एक लाख रुपये मोबदल्यात जामीन मंजूर केला आहे. सुनील केदार यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला न्यायालयात हजर व्हायचे आहे.

पाच वर्षांची होती शिक्षा
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह सहा आरोपींना कमाल पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येकी एकूण १२ लाख ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता.