ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

0
21
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया:-गोंदिया–गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावर आज गुरुवारला (दि.25)दुपारी एक वाजेच्या सुमारास ट्रक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.अनिल गोविंद दुरुगवार(वय 32,राहणार कारंजा) असे मृतकाचे नाव असून घटना घडताच परिसरातील स्थानिकानी अनिलला केटीएस रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.या घटनेची दखल घेत पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.