राज्यातील शिंदे सरकार झोपेतच काढते शासन निर्णय

0
848
शासनाच्या वित्त विभागाने आज काढलेला हाच तो शासन निर्णय ज्यात 2023 मुदतवाढ उल्लेख आहे.

खेमेंद्र कटरे :गोंदिया,दि.०१ फेब्रुवारी:- राज्यातील शिंदे फडणवीस पवारांची महायुती सरकार हे किती झोपेत काम करते हे स्पष्ट झाले.झोपेतील शिंदे सरकार च्या वित्त विभागाने आज राष्ट्रिय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाटी नियुक्त केलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबतचा शासन निर्णण काढला.त्या निर्णयात अहवालअंतिम करण्याकरीता पुन्हा मुदतवाढ देताना सरकारचे अवर सचिव महेंद्र सावंत यांचे लक्ष कुट होते हे कळायला मार्गच राहिला नाही त्यांनी १ फेबुवारी २०२४ ला मुदतवाढ देताना १५.११.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आले असे म्हटले आहे़.जेव्हा की २०२४ हे वर्ष लागलेले असताना मुदत २०२३ मध्ये कशी य़ावरुन शासन झोपेत काम करीत असल्याचे स्पष्ट झाले.