मोहाडी येथे तीस लक्ष रूपयाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

0
13

गोरेगाव,दि.0१– तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे मागील एक वर्षापासून गावातील विविध विकासकामे जोमात सुरू आहेत. त्यातच ३१ जानेवारी ला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अतिरिक्त निधीतुन तीस लक्ष रूपयाचे विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मण भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
यात हिरामन पटले यांच्या घरापासून ते चुन्नीलाल हरिणखेडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम पंधरा लक्ष रूपये, धर्मराज बघेले यांच्या घरापासून ते शालिकराम बघेले ( वाडाच्या झाडा पर्यंत) सिमेंट रस्ता बांधकाम दहा लक्ष रूपये व जुना बाजार चौक मोहाडी येथे गटु बांधकाम ( पेव्हिंग ब्लॉग) बांधकाम करणे पाच लक्ष रूपये नियोजित करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रमास गोरेगाव पंचायत समिती सदस्य रामेश्वर माहारवाडे, मोहाडी ग्रांम पंचायत सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, उपसरपंच मोहनलाल पटले, तंन्टामुक्ती गांव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले, सामाजिक कार्यकर्ते कमलेश पटेल,सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले, श्रीराम मंदिर देवस्थान समितीअध्यक्ष श्रीराम पारधी,माजी सरंपच मदनलाल बघेले, माजी सरपंच रजनीताई धपाडे, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंन्डे, योगराज भोयर, पुस्तकला पटले, चंन्द्रकांता पटले, नेहाताई उके, प्रभाताई पंधरे, पुजाताई डोहाळे, सामाजिक कार्यकर्ते भुराजी भोयर, बाबुलाल चौधरी, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले, चुळामन पटले,माजी उपसरपंच बाबुलाल चौव्हाण, सुखराम चौधरी,इसुलाल भगत,टेकचंद पटले,नेतेश्वर डोहाळे आदी मान्यवर उपस्थित होते.