रत्ने आणि दागिने आभूषण पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण

0
1

मुंबई दि 31 : रत्ने आणि दागिने निर्यात संवर्धन प्रोत्साहन परिषद देशाच्या निर्यात प्रोत्साहनाला पुढे नेण्यासाठी सरकारने सुरू केलेला सर्वात महत्त्वाचा उपक्रम असून रत्न आणि दागिने निर्यातीस प्रोत्साहन देण्यात परिषदेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रत्ने आणि दागिने आभूषण पुरस्कार वितरणाचे आयोजन हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

रत्ने आणि दागिने निर्यात संवर्धन प्रोत्साहन परिषद

राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट  यामध्ये प्रमोशन कौन्सिलच्या सदस्यांची संख्या 9600 आहे. ही मोठी बाब असल्याचे ते म्हणाले.सरकार आणि उद्योग यांच्यातील इंटरफेस म्हणून रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषद धोरण तयार करण्यात शासनाची भूमिका कौतुकास्पद आहे.

जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन परिषद दरवर्षी दुबई, जयपूर येथे आंतरराष्ट्रीय रत्न आणि आभूषण ज्वेलरी शो आयोजित करते.याच धर्तीवर मुंबई या ठिकाणी भव्य एकात्मिक ‘आंतरराष्ट्रीय’ शो सुरू करावे असे आवाहन ही राज्यपाल यांनी केले.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे.तसेच चित्रपट राजधानी सुध्दा आहे. मध्यपूर्वेतील बरेच लोक मुंबईत उपचार घेण्यासाठी येत असतात.  त्यामुळे मुंबई हे वैद्यकीय पर्यटनस्थळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रकारच्या संयुक्त आंतरराष्ट्रीय मुंबई महोत्सवामध्ये रत्न आभूषण शो च्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो,फूड फेस्टिवल,  फिल्म फेस्टिवल चे आयोजन करण्यात यावे. अनेक वर्षापासून भारत देश हा रत्न, आभूषण, हिरे, कलर स्टोन, यासाठी प्रसिद्ध आहे.भारताच्या कोहिनूर हिऱ्याची जगात ख्याती आहे.   आपल्याला मौलिक शिल्प, कौशल्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील 27 विद्यापीठांच्या कुलगुरूच्या वतीने समितीला विनंती करतो की, महाराष्ट्रातील विद्यापीठात आणि महाविद्यालयाने सोबत मिळून काम करण्यासाठी रत्न आणि आभूषण क्षेत्रात प्रशिक्षणार्थी/इंटरशिप सुरू करण्यासाठी आवाहन करण्यात असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. आभूषण निर्यात संवर्धन परिषद मार्फत  नवी मुंबई येथे एक आभूषण पार्क चालू करण्यात येत आहे. महिला रत्न आभूषण उद्योगक्षेत्रात सर्वात मोठी उपभोक्ता आहे. आता वेळ आली आहे की, महिलांना या उद्योगक्षेत्रामध्ये समाविष्ट करुन त्यांना आत्मनिर्भर बनवावे. महिलांना उद्योगक्षेत्रामध्ये नेतृत्व सांभाळण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्कता असल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले.

सन 2022-23 या वर्षातील उत्कृष्टरत्ने आणि दागिने निर्यात कामगिरीसाठी व त्यांच्या योगदानाबद्दल ‘रोझी ब्लू’चे व्यवस्थापकीय संचालक रसेल मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘लाइफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशसेवेबद्दल त्यांचे व इतर सर्व पुरस्कार विजेत्यांचे राज्यपाल श्री. बैस यांनी अभिनंदन केले.

यावेळी रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष विपुल शहा, उपाध्यक्ष किरीट भन्साळी, पुरस्कार समितीचे निमत्रंक मिलन चोक्सी, भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहताआदी मान्यवर उपस्थित होते.