* खरच अपघात, घातपात की भावनात्मकतेसाठी अजूनकाही
गोंदिया – निवडणुकीचा प्रचार आटोपून रात्री आपल्या गावाकडे जात असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या गाडीला भरधाव ट्रकने धडक दिल्याची बातमी कानी आली. या अपघाताचे आता राजकारण होत असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. खरी वस्तुस्थिती काय ते कळेलच मात्र भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत नानांना मात्र “अपघात”च संजीवनीचे काम तर करणार नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
दरम्यान नाना पटोले यांनी याप्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आमच्याच वाहनाला धडक मारल्याने शंका आहे,तक्रार दिली असून पोलीस योग्य तपास करतील असे म्हटले आहे.याप्रकरणात दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोटे आरोप करुन सहानुभूती लाटण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.
काळजी घ्या भाऊ @NANA_PATOLE https://t.co/Vft9CncX5U
— Pratik S Patil (@Liberal_India1) April 10, 2024
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या वाहनाला ट्रकची धडक
नाना पटोलेंच्या वाहनाला भीषण अपघात, होऊन ट्रकच्या धडकेत गाडीचा चुराडा झाल्याचे वृत्त आहे. सुदैवाने नाना सुखरूप आहेत. प्रचाराला राज्यभरात दौरे करणाऱ्या नेत्यांनी सुरक्षिततेची पुरेशी काळजी घ्यावी. उशीर चालेल पण अपघात नको. @NANA_PATOLE pic.twitter.com/zl4FEOCir2
— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) April 10, 2024