रहस्यमय ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

0
9

मुंबई (प्रतिनिधी): प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुची वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, अनोखा विषय आणि त्याची साजेशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर २६ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

चित्रपटाचं कथानक एका अशा वस्तूच्या भोवती फिरतं, जी व्यक्तीच्या तीन इच्छा पूर्ण करू शकते! नायकच्या घरी ती वस्तू येते तेव्हा त्याच्यासाठी आकाश ठेंगणं होतं. आता नायक आणि नायिका या वस्तूचा वापर करून नेमकं काय मागतात आणि त्यातून पुढे कशा घडामोडी घडत जातात, हे चित्रपटात कळणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन जिल्हा परिषद शाळेत पेशाने शिक्षिका असणाऱ्या प्रियांका यांनी केलं असून प्रवीण यशवंत आणि प्रीया दुबे या नव्या जोडीच्या भन्नाट केमिस्ट्रीसोबत संजय खापरे, मिलिंद दास्ताने, अरुण नलावडे, शमा निनावे आणि कमलेश सावंत या दिग्गज कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.

“गूढ आणि रहस्यमय कथा नेहमीच प्रेक्षकांना खास आकर्षित करतात, म्हणूनच अशा विषयांवर ‘प्रीत अधुरी’ सारखे खास चित्रपट प्रदर्शित करून रसिकांचं झकास मनोरंजन करण्याचा आमचा कायम सकारात्मक हेतु असतो. अल्ट्रा झकासचे वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी:- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies