22.4 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home Top News जनगणनेच्या मागणीवर पवार नेमके काय म्हणाले?

जनगणनेच्या मागणीवर पवार नेमके काय म्हणाले?

0
208

नागपूर,दि.०७: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी त्यांचे नागपुरात आगमन झाले. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवे आहे आणि जनता ते करून दाखवणार, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी जातीय जनगणनेविषयी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केले केली.

बुधवारी राहुल गांधी यांनी नागपुरात संविधान सन्मान संमेलन दरम्यान दरम्यान पुन्हा एकदा जातीय जनगणना आणि ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवणार अशी घोषणा केली. यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून आमच्या पक्षाकडून जातीय जनगणनेची मागणी सातत्याने होत आहे. जनगणना झाल्यास देशातील संपूर्ण समाजाचे चित्र समोर येईल. त्यामुळे जातीय जनगणना होणे अत्यंत आवश्यक आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे हे जातीय जनगणनेनंतरच निश्चित होणार आहे असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार याचे सकाळी ९ वाजता मुंबईहून आगमन झाले. दुपारी ११ वाजता ते पूर्व नागपूर मतदारसंघात दुनेश्वर पेठे यांच्या प्रचारार्थ वृंदावननगर येथे सभा घेतली.त्यानंतर ते तिरोडा व काटोल येथील सभांना संबोधित करणार आहेत.