24.4 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home विदर्भ निवडणूक खर्च निरीक्षक नागेंदर भुकया यांनी घेतला एफ.एस.टी. पथक प्रमुखांचा आढावा

निवडणूक खर्च निरीक्षक नागेंदर भुकया यांनी घेतला एफ.एस.टी. पथक प्रमुखांचा आढावा

0
98

गोंदिया, दि.7 : जिल्ह्यातील 63-अर्जुनी मोरगाव, 64-तिरोडा, 65-गोंदिया व 66-आमगाव विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक नागेंदर भुकया (IRS – 2016 Batch) यांनी एफ.एस.टी. (Flying Squad Team) पथक प्रमुखांची 6 नोव्हेंबर रोजी रेल्वे विश्रामगृह गोंदिया येथे आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील सर्व पथक प्रमुख उपस्थित होते.

यावेळी नागेंदर भुकया यांनी जिल्ह्यातील बाह्य सीमा अंतर्गत तसेच अंतर्गत अवैधरित्या येणारी रोख रक्कम, मद्य व सोने चांदी इत्यादीची तपासणी करण्याकरीता सीमा अंतर्गत नाका, बसस्थानके, रेल्वे स्टेशन तसेच विमानतळ येथे येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची, वाहनाची तपासणी करण्याबाबत तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाशी समन्वय साधुन तपासणी करण्याबाबत सूचना दिल्या. सदर कार्यवाही करतांना तपासणी वेळी सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता सुध्दा घेण्याचे सूचविले. प्रत्येक बाबीची तपासणी करणे सुध्दा गरजेचे असल्याचे त्यांनी निर्देश दिले, जेणेकरुन निवडणूक आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी पथक प्रमुखांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले. एफ.एस.सी. पथक यांना येणाऱ्या अडचणी बाबत त्यांनी जाणून घेऊन सदर अडचणींचे निराकरण करण्याकरीता मार्गदर्शन केले.

बैठकीला जिल्हा नोडल अधिकारी (खर्च) जनार्दन खोटरे, खर्च निरीक्षकांचे संपर्क अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले, सहाय्यक जिल्हा खर्च नोडल अधिकारी संदिप बोरकर व इतर अधिकारी उपस्थित होते.