राज्यात महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काही तास उरले आहेत. अशातच आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अशातच आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही यासंदर्भात अनेकजण संभ्रमात आहेत. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीला देखील यश आलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
आज होणाऱ्या शपथविधीला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे गृहखात्याच्या मागणीवर अडून बसल्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधीवर टांगती तलवार होती. मात्र या शपथविधी सोहळ्यात फडणवीस आणि अजित पवार हे शपथ घेणार की काय? असं चित्र दिसत होत.
आज आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार आहेत. तसेच महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी 5 डिसेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. हा भव्य शपथविधी सोहळा मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.मात्र या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला आज सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.