33.6 C
Gondiā
Monday, June 15, 2026
Home Top News अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

0
162

blank

मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ एक भीषण अपघात घडला आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडले आहे. या अपघातात एक मजुराचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा मजुर गंभीर जखमी झाला आहे.

उर्मिला कोठारे (Urmila Kothare) शूटिंग संपवून घरी परतत होती तेव्हा हा अपघात झाला. त्यावेळी तिची कार वेगात होती आणि ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला काम करत असणाऱ्या मजुरांना धडकून गेली. ही घटना मुंबईच्या कांदिवली पश्चिमच्या पोईसर मेट्रो परिसरात घडली आहे.

व्हिडीओ व्हायरल-

अपघाताच्या वेळी उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि ड्रायव्हर देखील दुखापत झाले आहेत. कारचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनास्थळावरील व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत, ज्यात कारचा भाग समोरून चक्काचूर झाला आहे.

 

या अपघातात एक मजुराचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा मजुर गंभीर जखमी झाला आहे. जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने स्थानिक नागरिक आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या चाहत्यांमध्ये खेदाची भावना निर्माण झाली आहे.

ज्या मजूरांना उर्मिलाच्या कारने उडवलं ते दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते, अशी माहिती समोर आलेली आहे. उर्मिलाही या अपघातात जखमी झालीये. पण एका मजूराचा यामध्ये मृत्यू झालाय. त्यामुळे सध्या पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरु असल्याचं सांगण्यात आलंय. मुंबईतील समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.