38.6 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला;२ जवानांचा मृत्यू तर ३ जवान गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला;२ जवानांचा मृत्यू तर ३ जवान गंभीर जखमी

0
68

blank

श्रीनगर:-जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा भागात आज शनिवारी मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळण्याची घटना घडली. या अपघातात २ जवानांचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाले आहेत.

यावेळी रुग्णालयात 5 जखमींना आणण्यात आले होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला होता. 3 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे. सैनिकांना घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकला बांदीपोरा येथील कूट पायीन भागाजवळ एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास ट्रक डोंगरावरून कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अपघातात २ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा बांदीपोरा येथून सदर कूट पायीन भागातून जाताना अपघात झाला. या ट्रकमधील चालकाचं वाहनावरील नियंत्रण गमावल्याने अपघात झाला आहे. या अपघातात २ जवनांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत, असेही त्यांनी सांगितलं.