मुंबई:- चित्रपट निर्माते व माजी खासदार प्रितीश नंदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. प्रितीश नंदी हे शिवसेनेच्या पाठींब्यावर राज्यसभेचे खासदार झाले होते. त्यांनी पत्रकारितेत मोठे करियर केले होते. तसेच अनेक पुस्तकांचे लेखक तसेच टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक आणि 1980 च्या दशकात इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक पदही भूषविले होते. त्यांनी ‘चमेली’ आणि ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ यांसारखे सिनेमे केले होते.
चित्रपट निर्माते, माजी खासदार, कवी लेखक, पत्रकार अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या प्रितीश नंदी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. प्रितीश नंदी यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियातून अभिनेते अनुपम खेर यांनी दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत प्रितीश नंदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. माझ्या सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या प्रितिश नंदी यांच्या निधनाबद्दल मला अतिव दुःख होत आहे आणि हे वृत्त ऐकूण आपल्याला धक्का बसला आहे. एक अद्भूत कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक आणि पत्रकार आपण गमावला आहे. माझ्या मुंबईतील सुरुवातीच्या उमेदीच्या काळात माझे प्रेरणा एक मोठा स्रोत होते. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आहेत.
प्रितीश नंदी यांचा जन्म १५ जानेवारी १९५१ रोजी पूर्व भारतातील बिहार राज्यातील भागलपूर येथे एका बंगाली कुटुंबात झाला होता. त्यांनी कवी ,चित्रकार, पत्रकार, संसदपटू, मीडिया आणि दूरदर्शन आदीत त्यांनी मोठे काम केले होते. ते महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार होते. शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेवर ते निवडून आले होते. त्यांच्या कवितांची इंग्रजी भाषेतील चाळीसहून अधिक पुस्तके आहेत. त्यांनी बंगाली, उर्दू आणि पंजाबी भाषेतील इतर लेखकांच्या कविता तसेच उपनिषदच्या नवीन आवृत्तीचे भाषांतर केले आहे. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक आणि 1980 च्या दशकात इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक होते.