विधानसभा उपाध्यक्षपदी आ. बडोलेंची वर्णी

0
368

गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.बडोले यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम केले आहे. आजपासून महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुंबई येथे सुरवात झाली. तत्पुर्वी उपसभापतींची निवड करण्यात आली. राजकुमार बडोले यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यांच्या विरोधात कुणाचेही नाव समोर न आल्याने त्यांची सर्वसंमतीने निवड झाली.