23.7 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home Top News इटियाडोह धरण बघायला आलेल्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

इटियाडोह धरण बघायला आलेल्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

0
268

चार वर्षे विहान गंभीर; हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ वाढला नागरिकांत दहशत
अर्जुनी मोरगाव,दि.३०ःतालुक्यातील पर्यटनस्थळ असलेले इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणाचा विसर्ग  बघण्याकरीता पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.अशातच आज ३० आँगस्ट रोजी सायकांळी ५.३० वाजेच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसह इटियाडोह धरणस्थळी पर्यटनाकरीता आलेल्या ४ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली.लोकांची गर्दी असतानाही जवळपास १०० फुटपर्यंत जंगलाच्या दिशेने त्या बालकाला ओढत नेले.मात्र उपस्थित पर्यटक व नागरिकांनी केलेल्या आरडाओरडीमुळे बिबट्याने त्या बालकाला सोडून पळ काढला.त्या जखमी बालकाचे नाव विहान भौतेष राॅय(वय ४,रा.दिनकरनगर,ता.अर्जुनी मोर)असे आहे.

विहान हा काका अजय सरदार (वय २५ रा.दिनकरनगर) यांच्या सोबत इटियाडोह धरण बघायला आलेला होता.धरण बघून परत जात असतांना ऐन गर्दीचे ठिकाण असलेल्या विश्रामगृह जवळील परतीच्या रस्त्यावर काकाच्या हातात आपली करंगळी पकडून चालत असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट हल्ला चढवत पायाला पकडून ओढत नेले. लगेच सोबत असलेले नातलग अजय सरदार यांनी बिबट्याला परतून लावण्याचा पहिला प्रयत्न केला.मात्र पुन्हा बिबट्याने थेट विहानच्या गळ्याला पकडून जवळपास १०० फुट जंगल परिसरात ओढत नेले.दरम्यान अनेक पर्यटकांच्या आरडा ओरड केल्यामुळे हल्लेखोर बिबट्याला परतून लावण्यात यश मिळवले.त्याठिकाणी व्यवसायकरीत असलेल्या पुजा पचारे व तेजराम पराते यांनी सहकार्य केले.या हल्यात चिमुकला विहान गंभीर जखमी झाला असून गळ्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे प्राथमिक उपचार करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले आहे.

blank