22.9 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ वर्धा नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई

वर्धा नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई

0
29

वर्धा, दि. २० – कामांत अनियमिततेचा ठपका ठेवत वर्धा पालिकेच्या नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांच्याविरूद्ध उपाध्यक्ष कलम कुलधरीया यांनी राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर निर्णय झाला असून कुत्तरमारे यांना नगराध्यक्षपदाकरिता अपात्र ठरवित त्यांचे सदसस्यत्वही रद्द करण्याबाबतचा आदेश गुरुवारी पालिकेत धडकला. या आदेशात त्यांना येत्या सहा वर्षांत इतर दुसरी कुठलीही निवडणूक लढविता येणार नसल्याचे उल्लेखित असल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.

राज्य शासनाचे ग्रामविकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी राज्यपालाच्या परवानगिने हा आदेश चार दिवसांंपूर्वीच काढला. शासनाच्यावतीने काढण्यात आलेल्या या आदेशावर राज्य शासनाचे उपसचिव अ. परशुरामे यांची स्वाक्षरी आहे. हा आदेश चार दिवसांपूर्वीचा असला तरी तो गुरुवारी नगर परिषदेला प्राप्त झाला आहे.