41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home Top News राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर एनसीपीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर एनसीपीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा

0
86

blank

मुंबई-भोंदू अशोक खरात याच्यासोबतचे कथित संबंध आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो-व्हिडिओ यामुळे रूपाली चाकणकर दुसरा धक्का बसला आहे. अगोदर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला तर आता राष्ट्रवादी कांग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद देखील त्यांना सोडावे लागले आहे. रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
भोंदू बाबा अशोक खरातला गुरू मानणे रूपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर टीका होत होती. पक्षातील अनेकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे केली होती. अखेर वाढता दबाव लक्षात घेता, चाकणकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. रूपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा.
रुपाली चाकणकर यांनी स्वतः ट्विट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत स्पष्ट केले की खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवसापासून माझी भूमिका स्पष्ट आहे. त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा बेकायदेशीर कृत्यांत माझा दुरान्वयेही संबंध नाही. तपासादरम्यान या सर्व गोष्टी समोर येतीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुराव्याशिवाय माध्यमांमधून होत असलेले आरोप अत्यंत वेदनादायक आहेत, पण सत्य लवकरच प्रखरतेने सिद्ध होईल, असेही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.