23.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home Top News जयललितांचं निधन, अपोलो रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

जयललितांचं निधन, अपोलो रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

0
44

चेन्नई, दि. 5 – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन झालं आहे. जयललिता (६८) यांना ताप आणि निर्जलीकरणामुळे २२ सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी हृदयक्रिया बंद पडल्यानंतर (कार्डियाक अ‍ॅरेस्ट) त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. प्रकृती बिघडल्याचं कळतात समर्थकांनी अपोलो रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. दोन महिने उपचार घेतल्यानंतर आज जयललितांनी अपोलो रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.