वाघाच्या कातड्याची तस्करी: तिघेजण छत्तीसगड वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात

0
13

गडचिरोली, ता.९: वाघाची शिकार करुन त्याचे कातडे बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडमधील अंबागड चौकी येथील वनाधिकाऱ्यांनी काल(ता.८) गडचिरोली जिल्ह्यातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
अमोल नेवारे व यादव गावळ (दोघेही रा.शिवणी ता.कुरखेडा) व पवन नरोटे (रा.बेळगाव ता.कोरची) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान कातडीच्या तस्करीप्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील तीन जणांना छत्तीसगडच्या वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी दुजोरा दिला.