चार जहाल नक्षल्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
15

गडचिरोली, ता.१४: राज्य शासनाच्या सुधारित आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत १० लाखांचे बक्षीस असलेल्या ४ जहाल नक्षलवाद्यांनी नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.
कान्हू उर्फ लालसाय महारसिंह मडावी (२५)रा. डाबरी, पो.मसेली, ता.कोरची, सुनील उर्फ सन्नू गट्टी आतलामी(२५)रा.मोरखंडी पो.बांदे, ता.पाखांजूर(छत्तीसगड), सरुणा उर्फ जोगी विज्या गावडे(२७) रा.सिरकोंडा, ता.सिरोंचा व आकाश उर्फ विकास बाजू जांगधुर्वे(२३) रा.मरकेगाव ता.धानोरा अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत.
यंदा जानेवारी ते डिसेंबर २०१६ या कालावधीत ४८ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नुकतेच आत्मसमर्पण केलेल्या चार नक्षल्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला जबर हादरा बदला असून, पोलिसांची आतापर्यंतची कामगिरी व संपादन केलेला जनतेचा विश्वास यामुळे नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण करीत आहेत, असे पोलिस विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आत्मसमर्पण केलेल्या ४ नक्षल्यांपासून प्रेरणा घेऊन अन्य नक्षलवादीही नक्कीच आत्मसमर्पण करतील, असा विश्वास पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.