30 डिसेंबरपर्यंत 50 टक्के चलन बाजारात

0
9

नवी दिल्ली, दि. 15 – पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर देशभरात निर्माण झालेली चलन टंचाई दूर करण्यासाठी युद्धपातळीपर प्रयत्न सुरू असून, 30 डिसेंबरपर्यंत 50 टक्के चलन बाजारात येईल. असे अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी आज सांगितले. त्यामुळे नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनटंचाईमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना किमान नव्या वर्षात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दास यांनी चलन टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली, दास म्हणाले,