23.9 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home Top News जुन्या नोटा कितीही असल्या तरी बँक 5 हजारच स्वीकारणार

जुन्या नोटा कितीही असल्या तरी बँक 5 हजारच स्वीकारणार

0
25

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था) दि. 19 – नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बँकेत भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र 30 डिसेंबरला काही दिवस शिल्लक असतानाच केंद्र सरकारने धक्का देत नवीन घोषणा केली आहे. यानुसार जुन्या चलनातील नोटा कितीही असल्या तरी फक्त पाच हजारापर्यंतची रक्कमच बँकेत जमा करता येणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास ती स्वीकारली जाणार नाही. अनेक लोक करंट अकाऊंटमध्ये आपला काळा पैसा जमा करुन पांढरा करत असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे.

हा नियम फक्त जुन्या नोटांपुरता असून नव्या नोटा असतील तर तुम्ही कितीही रक्कम खात्यात जमा करु शकता. पण जर तुमच्याकडे जुन्या नोटा असतील तर फक्त पाच हजार रुपये स्विकारले जाणार आहेत. पाच हजारापेक्षा जास्त रक्कम असल्यास अपवादात्मक स्थितीत ती रक्कम स्वीकारण्यात येईल. मात्र आतापर्यंत जुन्या नोटा का भरु शकला नाहीत, याचं स्पष्टीकरण दोन बँक अधिकाऱ्यांच्या साक्षीने द्यावं लागणार आहे. इतकंच नाही तर बँकेला ग्राहकाचं उत्तर रेकॉर्डवर ठेवणं बंधनकारक राहील.

blank