भंडारा-गडचिरोलीत काँग्रेस-राँका भुईसपाट,भाजपची बल्लेबल्ले

0
25

गोंदिया, दि. 19 – राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गड राखला तर औरंगाबादमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, तर भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याचे निकालावरुन समोर आले आहे. पुर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचा बालेकिल्ला.पण हा बालेकिल्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीत पार भुईसपाट झाला आहे.सोबतच काँग्रेसही धुळीस मिळाली आहे.तर गडचिरोलीत पहिल्यांदाच भाजपला यश आले आहे.साकोली नगरपरिषदेवर पहिलीच सत्ता भाजपच्या हाती आली आहे.
साकोलीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माजी आमदार सेवक वाघाये हेच पुढचे आमदारकीचे उमेदवार राहणार असल्याच्या केलेल्या घोषणेनेच नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचेच मतदार काँग्रेसपासून दुरावल्याची चर्चा होती.तर प्रदेश काँग्रेसने स्थानिक काँग्रेसच्या काही नेत्यांना डावलल्याचा फटका अपक्षाचा माध्यमातून निकालात आला.तर तुमसर नगरपरिषदेला विकासात्मक बाबीत समोर आणून हांगणदारीमुक्त नगरपरिषद बनविण्यासाठी प्रयत्न करणारे व विकास घडवून आणणाने नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनाही भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदिप पडोळे यांच्याकडून 543 मतानी पराभव स्विकारावा लागल्याने जनतेने विकासापेक्षा राज्य व केंद्रातील सरकार कुणाची याकडेच लक्ष दिल्याचे निकालातून समोर आले.
तुमसर नगरपरिषदेच्या 23 जागेपैकी 15 जागा भाजपने जिंकल्या ज्यामध्ये राज्या लांजेवार,सौ छाया मलेवार ,मेहताब ठाकुर,वर्षा विक्रम लांजेवार,पंकज बालपांडे,सुनिल पारधी,सौ कीरन जोशी
,सौ कांचन कोडवानी ,सौ तारा गभणे,सचिन बोपचे,सौ अर्चना भुरे,सौ शीला डोये,सौ गिता कोंडेवार.राष्ट्रवादीने फक्त 2 जागा जिकंल्या सत्तेत असतानाही त्यामध्ये सलाम तुरक,सौ खुषलता भवसागर तर काँग्रेसने 3 जागा जिंकल्या यामध्ये अमर रगडे, बाळा ठाकुर,सौ स्मिता बोरकर यांचा समावेश आहे.अपक्षांनी 3 जागा जिंकल्या शाम धुरवे, सौ विध्या फुलेकर, किषोर भवसागर
यांचा समावेश आहे.
भंडारा नगर परिषदेच्या ३३ पैकी भाजपने 15 जागा जिंकल्या सोबतच नगराध्यक्षपदी भाजपचे सुनिल मेंढे हे विजयी झाले.भाजपमधून शिवसेनेत गेलेले सुर्यकांत इलमे हे पराभूत झाले.सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 11 जागावर समाधान राहावे लागले.काँग्रेसला 3 आणि अपक्षांनी ४ जागा जिंकल्या.
गडचिरोली नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भाजपला विजय मिळाला आहे.भाजपच्या योगिता पिपरे या विजयी झाल्या आहेत.त्यानी विद्ममान नगराध्यक्ष डाॅ.अश्विनी धात्रक व राष्ट्रवादीच्या प्रा.कविता पोरेडडीवार यांचा पराभव केला.25 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे २१ नगरसेक विजयी झाले आहेत. २ जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. तर शहर विकास आघाडीचे रमेश चौधरी विजयी झाले आहेत. काँग्रेस ला एका जागेवर यश मिळाले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली आहे.
प्रभाग ३ मधून भाजपचे प्रवीण वाघरे विजयी झाले आहेत. प्रभाग ५ मधून काँग्रेसचे सतीश विधाते विजयी झाले आहेत. प्रभाग १ मधून अपक्ष प्रशांत खोब्रागडे, माधुरी खोब्रागडे विजयी झाल्या आहेत. तसेच भाजपचे रितू कोलते, गुलाब मडावी, अनिता विश्रोजवार विजयी झाल्या आहेत. राकॉ व शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. काँग्रेस चे शहर अध्यक्ष सतीश विधाते विजयी झाले आहेत.

Exif_JPEG_420
देसाईगंज नगर परिषद निवडणूकीत भाजपच्या शालू दंड़वते या 1000 मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.प्रभाग क्रमांक ९ अ किरण लालाजी रामटेके भाजपा विजयी झाले.तर एकूण १७ जागेपैकी भाजपा १२,कांग्रेस ४ आणि राष्ट्रवादी कांग्रेस १ ला जागा मिळाली आहे.

नवनिर्वाचित साकोली नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केली असून नगराध्यक्षपदावर भाजपच्या धनवंता राऊत या विजयी झाल्या आहेत.
१७ जागेपैकी 12 भाजप विजयी, १ राष्ट्रवादी काँग्रेस,1 काँग्रेस ,3 अपक्ष उमेदवार विजयी झाले.तर पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या पुनम विलास काटेकाये या निवडून आल्या आहेत.त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.पवनी नगर परिषद- एकूण जागा 17 नगर विकास आघाडी- 06 राष्ट्रवादी- 03 काँग्रेस- 06 भाजप -2 नगराध्यक्षपदी नगर विकास आघाडीच्या पुनम काटेखाटे विजयी.

नांदेड : उमरी नगरपालिकेत सर्वच्या सर्व 17 जागांवर राष्ट्रवादीचा विजय, नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या अनुराधा खांडरे विजयी

नांदेड : अर्धापूर नगर पंचायतीत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेस 10, राष्ट्रवादी 4, एम आय एम 2, अपक्ष 1 जागा मिळाली आहे.

नांदेड : बिलोली नगरपरिषदेतही काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेस 12, भाजपा 4, तर अपक्ष 1 जागा मिळाली आहे. तर नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या मैथिली कुलकर्णी विजयी झाल्या आहेत.

नांदेड : कंधार नगर पालिका अंतिम निकाल नगराध्यक्षपजी काँग्रेस विजयी. शिवसेना 10, कॉग्रेस 5, अपक्ष 2, नगर पालिका अध्यक्षपदी काँग्रेसच्या शोभा नलगे विजयी.

नांदेड : माहूर नगर पंचायत अंतिम निकाल हाती. राष्ट्रवादी 8, काँग्रेस 3, बीजेपी 1, एम आय एम 1, शिवसेना 4 जागांवर विजयी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रदीप नाईक यांना धक्का.

नांदेड : मुखेड नगराध्यक्षपदी काँग्रेसचे बाबूराव देबडवार विजयी. 400 मतांनी झाला विजयी, भाजपाचे गंगाझर राठोड यांचा केला पराभव, स्थानिक भाजपा आमदार तुषार राठोड, शिवसेना आमदार सुभाष साबने यांना धक्का, पराभूत उमेदवार गंगाधर राठोड हे आमदार तुषार राठोड यांचे मोठे बंधू

औरंगाबादमधील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचा अंतिम निकाल

खुलताबाद नगरपालिका (एकूण जागा – 17)भाजप – 4 शिवसेना – 3 काँग्रेस – 8 राष्ट्रवादी काँग्रेस – 2 नगराध्यक्षपदी काँग्रेसचे एस.एम.कमर विजयी, भाजपाच्या नवनाख बारगळ यांचा केला पराभव

गंगापूर नगरपालिका (एकूण जागा – 17) भाजप – 2 शिवसेना – 8 काँग्रेस – 7 राष्ट्रवादी काँग्रेस – 0 नगराध्यक्षपदी भाजपाच्या वंदना पाटील विजयी झाल्या असून त्यांनी काँग्रेसच्या सुवर्णा जाधव यांचा पराभव केला. या ठिकाणी भाजपा शिवसेनेची युती होती.

कन्नड नगरपालिका (एकूण जागा – 23) काँग्रेस – 14 रायभान जाधव आघाडी – 4 शिवसेना – 2 एमआयएम – 2 अपक्ष – 1 भाजप – 00 राष्ट्रवादी काँग्रेस- 00 काँग्रेसने सर्वाधिक जागांवर विजय मिळत नगराध्यक्षपदी स्वाती कोल्हे विजयी झाल्या आहेत.

पैठण नगरपालिका : (एकूण जागा – 23) शिवसेना – 7 राष्ट्रवादी काँग्रेस- 6 भाजप – 5 काँग्रेस – 4 अपक्ष -1 नगराध्यक्षपदी भाजपाचे सुरज लोळगे विजयी झाले असून त्यांनी शिवसेनेच्या राजू परदेशी यांचा पराभव केला आहे.