24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home Top News तीन मोरांची विष देऊन शिकार,आरोपींचा शोध सुरु

तीन मोरांची विष देऊन शिकार,आरोपींचा शोध सुरु

0
27

गोंदिया,दि.29- तालुक्यातील दासगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या लोहारा गावाजवळील तलावावरील खाद्य पदार्थात विष घालून तीन मोरांची शिकार केल्याचे प्रकरण बुधवारी उघडकीस आले.दररोजप्रमाणे गावातील गुराखी हा दुपारच्यावेळी जनावरांना पाणी पाजण्यासाठी तलावाकडे घेऊन गेला असता तलावातील पाण्याजवळ तीन मोर मृतावस्थेत आढळून आले.त्याची माहिती संबधित वनविभागाच्या प्रमुखांना दिली.त्यानंतर वनअधिकारी यांनी तिन्ही मृत मोरांना ताब्यात घेऊन त्यांचे शवविच्छेदन केले असता विष देऊन त्यांना ठार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.वनविभागाचे अधिकारी या प्रकरणातील आरोपीचा कसून शोध घेत आहे.
यापुर्वी सुध्दा अनेकदा लोहारा तलावात हिवाळाच्यावेळी बाहेरुन येत असलेल्या विदेशी पक्षांची शिकार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे,परंतु त्याचा शोध अद्यापही वनविभागाचे प्रमुखांना यश आलेले नाही.