23.8 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home Top News पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, चार ठार

पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, चार ठार

0
21

सोलापूर, दि. 6 – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याशेजारी बंद अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकला स्कॉर्पिओची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. हा अपघात आज रात्री घडला.
दरम्यान, अपघातानंतर रस्त्यावर कांदे पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अपघातात मृत झालेल्या सर्व व्यक्ती स्कॉर्पिओंमधून प्रवास करत होते. वडवळ, ता मोहोळ येथे वास्तुशांति कार्यक्रम आटोपून निघाले असताना हा अपघात झाला.