30.1 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home Top News स्कूल बस- ट्रकची धडक, २५ विद्यार्थी ठार

स्कूल बस- ट्रकची धडक, २५ विद्यार्थी ठार

0
26

लखनू, दि. १९ – दाट धुक्यामुळे स्कूल बस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. इटा जिल्ह्यातील अलीगंज येथे आज सकाळ हा अपघात झाला असून सुमारे ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

जे. एस. विद्या शाळेची बस ५० विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. धुक्यामुळे बस चालकाला समोरचा अंदाज आला नाही आणि बस ट्रकवर जाऊन आदळली. ‘अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे,’ अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी दिली आहे.