आता प्रत्येक सिम कार्डसाठी ‘आधार’ आवश्यक – सुप्रीम कोर्ट

0
5

नवी दिल्ली,वृत्तसंस्था दि. 6 प्रत्येक जुन्या आणि नवीन सिम कार्डसाठी आता आधार क्रमांक देणं बंधनकारक असणार आहे. सुप्रीम कोर्टाने आज (सोमवारी) केंद्र सरकारला प्रत्येक मोबाईल नंबरचं रेजिस्ट्रेशन आधार कार्डाशी जोडाण्याचे आदेश दिले आहे. तर केंद्र सरकारने एका वर्षात ही प्रक्रिया पूर्ण करू, असे आश्वासन सुप्रीम कोर्टाला दिले.
लोकनीती संस्थेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. देशातल्या 105 कोटी सिम कार्ड्स पैकी 5 कोटी कनेक्शन्सची पडताळणी झालेली नाही. त्यासाठी सरकारनं पाऊले उचलावीत, कारण पडताळणी न झालेली कार्डस् फ्रॉड किंवा देशविरोधी कारवायांसाठी वापरली जाऊ शकतात, असे या याचिकेत म्हटले होते. त्यावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला आहे.

नव्या सिमसाठी
* आधारची प्रत सक्तीची
* इतर कागदपत्रांची गरज नाही

जुन्या सिमसाठी
* आधार क्रमांक बंधनकारक
* मोबाईल गॅलरीत जाऊन आधारची प्रत द्या
* नाहीतर तुमचं सिम बंद होऊ शकतं