—————————————-
गोरेगाव दि.०६:- तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कालीमाटीची निवडणुक ता ४ फेब्रुवारीला घेण्यात आली या निवडणुकीत सहकार पँनलचे १३ सदस्य रामभाऊ ब्राम्हणकर यांच्या नेतूत्वात निवडुन आले.या निवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन पि सी गुप्ता हे होते व सहकारी एस के रंगारी, पि जी पारधी, सोनु डुंभरे यांनी काम पाहीले.ही निवडणुक जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा कालीमाटी येथे घेण्यात आली.यात सर्वसाधारण गटातुन मार्कंडराव ब्राम्हणकर, हेमराज भांडारकर, माणिकचंद बिसेन, अनंतराम बिसेन, शिवचंद कटरे, सुकराम चौव्हाण, शामराज तुरकर, इसुलाल पटले इतरमागास वर्गातुन दिलीप क्षिरसागर अनुसुचित जाती/जमाती वर्गातुन गुलाबराव भास्कर, भटक्या विमुक्त जाती, जमाती गटातुन रुपचंद मेश्राम, महीला राखीव गटातुन रुखमाबाई नेवारे, जशोदाबाई पटले असे तेरा सदस्यांची बहुमताने निवड करण्यात आली.यांचे अभिनंदन शिवकुमार रांहागडाले, रितेश ब्राम्हणकर, अमीत भांडारकर, उमराज मौदेकर, दिनदयाल चौरागडे, सुखदास डोंगरे, डोमाजी नाईक, प्रेमलाल तुरकर, जोशीराम नेवारे, संदीप असाटी यांनी केले




