28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home Top News प्रेरणा एक्सप्रेसखाली चिरडून तिघांचा मृत्यू

प्रेरणा एक्सप्रेसखाली चिरडून तिघांचा मृत्यू

0
30

धुळे, दि. 12 – भुसावळकडून सूरतकडे जाणा-या प्रेरणा एक्सप्रेसखाली चिरडून तीन जणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नरडाणा रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर प्रेरणा एक्सप्रेसखाली चिरडून तीन जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर मृत झालेल्या व्यक्तींसोबत असलेल्या २८ वर्षीय महिलेचा अाणि तिच्या लहान मुलीचा अद्याप शोध लागलेला नाही. पिंटु आसाराम भील ( ३५) शिवदास भील (२८) आणि मोठाभाऊ भील (१८) अशी मृतांची नावे आहेत. तर विठाबाई पिंटु भील (28)आणि लहान मुलगी अक्काबाई अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.