लोकसहभागातून महाजनटोला शाळा झाली डिजिटल

0
14

देवरी दि.१२ -: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व मेक इन इंडियाचे स्वप्न बघत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षण मिळावे या हेतूने तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा महाजनटोला येथे लोकसहभागातून डिजिटल शाळा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे उद््घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते पं.स.सभापती देवकी मरई यांच्या अध्यक्षतेखली संपन्न झाले. विशेष अतिथी म्हणून माजी आमदार रामरतनबापू रऊत, जि.प.सदस्या उषाताई शहारे, सरपंच फुलकुवर सलामे, राजाराम सलामे, लंजे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान सरस्वती मातेचे पूजन व माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते डिजिटल शाळेचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी आमदार संजय पुराम यांनी लोकसहभागातून निर्माण झालेल्या डिजिटल शाळेतील ग्रामवासीयांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. संचालन प्रतिम राठोड तर आभार आर.ए.उके यांनी मानले. डिजिटल शाळेच्या निर्मितीसाठी टी.एम.सलामे, साहाय्यक शिक्षक प्रवीण सरगर यांनी मोलाचे सहकार्य केले.