११०० कोटींच्या कामांसाठी दिली १०० काेटींची अाॅफर

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

जामनेर – आघाडी शासनाच्या काळात जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून ७० कोटींच्या कामांचे टेंडर वाढवून ३७२ काेटी रुपयांपर्यंत करण्यात अाले. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार अाल्यानंतर जलसंपदा विभागातील १,१०० कोटी रुपयांची कामे थांबवली. ही कामे पुन्हा सुरू करण्यासाठी ठेकेदार १० कोटी रुपये घेऊन आले होते. ते घेण्यास नकार दिल्याने १०० कोटी रुपये कमिशन देण्यापर्यंत त्यांची तयारी होती, असा गौप्यस्फाेट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जामनेरात केला.

जामनेरात गिरीश महाजन यांचा सत्कार समारंभ अायाेजित केला हाेता. या वेळी ते म्हणाले, अाता जलसंपदा विभागातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. संपूर्ण गैरव्यवहाराची चाैकशी करण्याचे अादेश दिले अाहेत. गैरव्यवहारात जे दाेषी अाढळतील त्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार अाहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत असून, महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचे आहे. आघाडी शासनाच्या काळात राज्यात केवळ लूटच झाली. अाता राज्याला भ्रष्टाचारमुक्त करायचे अाहे. विविध करांच्या माध्यमातून जनतेचा पैसा शासनाकडे जमा होत असतो. त्यामुळे जनताच खऱ्या अर्थाने मालक असल्याने त्यांच्या पैशांची उधळपट्टी अाता हाेऊ देणार नाही, असे महाजन यांनी सांगितले. या वेळी व्यासपीठावर सुरेशचंद्र ललवाणी, सुरेश ओसवाल, रमेश ओसवाल उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकले
जलसंपदािवभागातील कामे थांबवल्यानंतर ठेकेदारांची १० टक्केप्रमाणे १०० काेटी रुपये देण्याची तयारी हाेती. ही गाेष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरही टाकली अाहे. त्यांनी भ्रष्टाचारात दाेषी अाढळणाऱ्यांची गय करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्याचे महाजन यांनी सांगितले.

सत्कार अायाेजित करू नका
गेल्याकाही वर्षांतील निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असून, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहता यापुढे कुणीही सत्कार समारंभ आयोजित करू नये, अशा सूचना महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.