बंगळुरू शहरात कमी तीव्रतेचा स्फोट, दोन जखमी

0
8

बंगळुरू – शहरातील चर्च स्ट्रीट भागात रात्री 8.30 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट कोकोनट ग्रो रेस्तरॉजवळ झाला. या स्फोटामध्ये एक महिला आणि एक पुरूष जखमी झाले आहेत.
स्फोट कमी तीव्रतेचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. स्फोटामध्ये आईडीचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कायदा व न्यायमंत्री सदानंद गौडा यांनी बेंगळूरू येथील स्फोटाची घटना दुर्दैवी असल्याचे ट्विट केले आहे. तसेच गौडा थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बेंगळूरू येथील चर्च स्ट्रीट जवळ कोकोनट ग्रो या रेस्टॉरंट बाहेर कमी शक्तीचा स्फोट.या स्फोटात जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला माल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कर्नाटकच्या मुख्य मंत्र्यांनी भेट दिली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केली आहे.