भारतीयांची दिशाभूल करण्यासाठी जातिवाद्यांनी रचला नकली संविधान

0
17

खेमेंद्र कटरे
गोंदिया- भारत देशातील सव्वाशे कोटी जनतेला राजकीय स्थर्य प्रदान करून भारतासारख्या विशाल देशात विधीचे राज्य निर्माण करणाèया व समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव प्रस्थापित करणाèया भारतीय राज्यघटनेची जगात उदो-उदो होत असतानाच मनुस्मृतीचे राज्य आणू पाहणाèयांना पोटात सु़ळ उठले आहे. परिणामी भारतीय जन सामान्य माणसांची दिशाभूल करण्यासाठी जातीयवाद्यांनी एका नकली संविधानाची निर्मिती करून जनतेला फसविण्याचे कार्य सुरू केले आहे.
भारतीय राज्यघटनेची भाषा ही लिगल लॅग्वेज असते. न्यायालयीन कार्य, न्याय निवाडे तसेच कायदयाचे अध्याय करण्याकरिता संविधानाची नितांत गरज असते. परंतु ज्यांना भाषेची जाणीवच नाही अशा मनुवादयांनी आणि कॉपीबहादुरांनी भारतीय स्वातंत्र्यांच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त भारताचे नवीन संविधान म्हणून एका वेबसाईटवर हा नकली संविधान प्रकाशित केलेला आहे.
ज्यांना सामाजिक संस्था चालविण्याची धड मनोरंजन ऑफ असोसिएशन लिहिता येऊ शकत नाही. त्यांनी नकली भारतीय संविधान लिहिण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे. देशातील गरिबी, अंधश्रद्धा आणि अशिक्षितपणाचा फायदा घेऊन यापूर्वी गणपतीला दूध पाजणे तसेच qहदुना एकसंघ ठेवण्यासाठी देशात घरवापसीच्या नावावर धर्मांतरांसाठी लोकांना मजबुर करणे अशी कामे करण्याचा काही जातीयवादी व धर्मांधशक्ती कार्यरत आहेत. अशी कारस्थानेही तेव्हाच केली जातात तेव्हा यांचेच सरकार केंद्रात असते. त्यामुळे जिसकी लाठी उसकी भैंस,या म्हणीचा तंतोतंत वापर करण्यात ही मंडळी चुकतांना दिसत नाहीत.
विद्यार्थी परिषदेच्या काही कॉफीबहादुरांनी एकत्र येऊन नकली संविधानाची प्रत वेबसाईटवर प्रकाशित केली आहे. हे करणे सोपे काम नव्हे. लोकांनी नि:शुल्क या बेबसाईटचा वापर करून आपली प्रतिक्रिया दयावी अशी आग्रही विनंती या कॉफीबहादुरांनी केली आहे. यावर चर्चा व्हावी आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने केंद्र सरकारने एखादी योजना आणावी असच त्यांचा हेतू दिसून येतो. कारणही हेच आहे की, त्यांचा लाजिरवाणा प्रकार अनावश्यक असून जनसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.
आपलेच सरकार असल्याने हम करो सो कायदा अशी वृत्ती या लोकांची दिसून येत आहे. भारतीय राज्य घटनेवर आधारित भारताचे राज्य १९५० पासून सुरळीत सुरू असतांना अशी शरारत करण्याची यांची हिमंत कशी झाली? असा प्रश्न जनमानसात निर्माण झाला असून सूर्याला दिवा दाखविण्यात यांचा कोणता हेतू साध्य होणार आहे हे एक न उलगडणारे कोडेच आहे.
भारतीय राज्यघटनेत भारतीय लोकांना मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आले असून या मूलभूत अधिकारांबरोबर लोकांना मूलभूत कर्तव्यही पालन करावयाची आहेत. भारतीय राज्घटनेला अनुच्छेद ५१(क) मूलभूत कर्तव्य यामध्ये (क) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे हा एक कर्तव्याचा भाग आहे. असे असतांना नकली संविधान तयार करणाèया कॉफीबहादुरांना भारतीय राज्यघटनेचा अनादर केल्याचा ठपका ठेवून यांच्यावर कारवाई व्हावी अशी जनसामान्यांची इच्छा आहे.
भारतीय राज्यघटनेने सर्वसामान्य मानसाला प्रौढ मताधिकार देऊन राजकीय शक्ती प्रदान केली. मूठभर शोषक व अत्याचारी जाती यांचा बेबंदशाही नष्ट केली. आता राजा राणीच्या पोटातून नाही तर मतपेटीतून जन्माला येत आहे. या देशातील अनुसूचित जाती, जनजाती आणि अन्य मागासवर्गीयांच्या जीवनमान उंचावण्याचे श्रेष्ठ कार्य भारतीय राज्यघटनेमुळे घडले आहे. तेव्हा सनातनी प्रस्थापित आणि निकृष्ट मानसिकतेच्या लोकांना भारतीय राज्यघटनेचे चीड निर्माण झाली आहे.
वर्णभेद आणि जातिवादाच्या नावावर एकेकाळी समाजात फूट पाडून आपण शासन बनणार याचीच qचता सतावत आहे. या लोकांनी संविधान बदलविण्याची भाषा बोलले qकवा नकली संविधान लिहून लोकांची दिशाभूल करणे हा कार्यक्रम हाती घेतल्याचे दिसून येते. परंतु यांचे मनसुबे पूर्णत्वाला जाणार नाहीत.
यापूर्वी घडलेली काही उदाहरण देता येईल. तो असा लुधियाना येथील एका व्यक्तीने आपला मुलगा उषरबोध हा संस्कृत भाषा अवगत देऊ शकतो, तो तेरा वर्षाचा असून त्याला संस्कृत भाषा अवगत असल्याने त्याची प्रसिद्धी वृत्तपत्रात होऊ लागली. त्याच्या वडिलांचे असे म्हणणे होते की, आम्ही वैदिक संविधानाची निर्मिती केली पाहिजे कारण वेदांमध्ये जे संविधान आहे त्यांच्यासारख्या जगात संविधान नाही. हे संविधान आपला तेरा वर्षाचा मुलगा संस्कृतमध्ये लिहीलेल्या वेदांमधून तयार करू शकतो असा उषरबोधच्या वडिलांचा आता विश्वास होता.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी संविधान लिहिण्यात मग्न होते. ही बाबा त्यांच्या कानावर टाकण्यात आली की उषरबोध नावाच्या १३ वर्षाचा मुलगा संस्कृत वेदांचे वाचन करून संविधान बनविण्याची विधी सांगतो. त्यामुळे त्याला बोलविण्याचे आदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. चर्चा चांगलीच रंगली. उषरबोध यांनी सांगितले की, परमात्मा यांनी आदिसृष्टीमध्ये मानवाच्या कल्याणासाठी संस्कृतमध्ये वेद निर्माण केले आहेत. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी त्यांना तीन प्रश्नांची माहिती वेदातून देण्यास सांगितले. प्रश्न १- परराष्ट्रव्यवहार कसा करायचा? प्रश्न २- वेदांमध्ये विज्ञान आहे तर परमाणू बम कसा बनवायचा याची विधी वेदात कशी आहे. प्रश्न ३- आमचा देश फारच गरीब आहे, अमेरिकेची बरोबरी करण्यासाठी वेदातील सोने बनविण्याची विधी सांगावी? असे प्रश्न विचारले असता तो निरुत्तर झालेत. आणि पळती वाट घेतली.
असाच प्रकार नकली संविधानाचा दिसून येतो. यामुळे असे निदर्शनास येते की जातीवादयांनी वेबसाईटवर नकली संविधान प्रसिद्ध करून खोडसाळपणा केला आहे. अशा लोकांवर कार्रवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.