शेलारांच्ङ्मा लक्षवेधीतील किल्ला गोंदिङ्मात नाहीच!

0
21

गोंदिया-नुकतेच नागपूर येथे राज्यसरकारचे हिवाळी अधिवेशन पार पडले.या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नाना प्राधान्याने वाचा फोडण्याचे काम केले गेले.विदर्भाताली प्रश्न व समस्याप्रंती किती लोकप्रतिनिधी जागृत आहेत.याचा प्रत्यय बघावयास मिळाले.qसचनासोबतच विकासाच्या मुद्यावर राज्यसरकारला जाब विचारण्यात आला.यातंर्गतच मुंबईतील भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही एक प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभात मांडला होता.तो लक्षवेधी प्रश्न पुरातत्त्व विभागाशी आणि गोंदिया जिल्ह्याशी संबधित असल्याने त्या प्रश्नाची संकलित माहिती विधानसभा प्रधानसचिवाकडे सादर करण्याची जबाबदारी सुध्दा गोंदिया जिल्हा प्रशासनाचीच ना.फॅक्स संदेशद्वारे आलेल्या त्या लक्षवेधीतील प्रश्न बघून कर्मचारी सोडा चांगल्या चांगल्या अधिकाèयाचीच भंबेरी उडाली.परंतु प्रश्न लक्षवेधीच्या स्वरूपात उपस्थित झाल्याने त्याच्या माहितीसाठी सांस्कृतिक व पुरातत्त्व विभागाच्या वतीने गोंदिया जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविण्यात आले. त्या लक्षवेधी प्रश्नामध्ये गोंदिया जिल्ह्यातील qसघुर,qसनगोडी या पुरातन किल्याच्या अवस्थेसंदर्भात उल्लेख करण्यात आला होता.
गोंदिया जिल्हा हा भंडारा जिल्ह्यापासून वेगळा झालेला जिल्हा.या जिल्ह्यातील इतिहासाकडे बघितल्यास qसघुर किंवा सिनगोडी नावाचे किल्लेच अस्तित्वात नाही.जे आहेत त्यामध्ये प्रतापगड किल्याच्या उल्लेख केला जाऊ शकतो.नागरा येथे पुरातन मंदिर आहे,परंतु किल्ला नाही.कचारगडला गुफा आहे. परंतु किल्ला नाही अशा परिस्थितीत मात्र भारतीय जनता पक्षाचे वरिष़्ठ आमदार आशिष शेलार यांना गोंदिया जिल्ह्यातील qसघुर व सिनगोडी या पुरातन किल्यांची दुरावस्था झाल्याचे आठवले आणि त्या किल्यांची सध्याची परिस्थिती काम आहे,त्यांच्या विकासासाठी शासनाची काम भूमिका अशा प्रश्नच आपल्या सरकारकडे लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला.आणि येथूनच या किल्यांच्या खरा शोध सुरू झाला.
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील तिन्ही उपविभागीय अधिकारी आपल्या परीने या किल्याच्या शोध घ्यायला लागले, परंतु त्यांना किल्लाच काय त्याचा साधा इतिहास सापडला नाही.त्या किल्ल्याच्या शोधासाठी जिल्ह्यातील सर्वांत जुन्या व माहिती असणाèयानांही त्यांनी यासाठी पाचारण केले.पण कुणीही आमदार शेलार साहेबांनी शोधून काढलेल्या गडकिल्याची माहिती देऊ शकले नाही.
अखेर जिल्हा प्रशासनाने या नावाचे किल्लेच गोंदिया जिल्ह्यात नसून शेजारील भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सानगडी येथे शहानगड नावाचा किल्ला असल्याची माहिती भरून विधानसभा सचिवाकडे पाठविली.
माझ्या मित्रांनी दिली माहिती-आमदार शेलार
या लक्षवेधी संदर्भात मुंबईतील भाजपचे आमदार आशिष शेलार यांना भ्रमणध्वनीवर विचारणा करण्यात आली असता त्यांनी कुठल्या तरी वर्तमानपत्रात बातमी आली होती,ती बातमी मित्रांने दिली.त्या आधारे लक्षवेधी लावल्याचे सांगितले.परंतु अधिक माहिती नसल्याचे मान्य करीत नंतर बोलतो असे बोलून त्यांनी विषय टाळला.