CRPF ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 7 जखमी

0
11

श्रीनगर, दि. 3 – श्रीनगरमधील पंथा चौकात संशयित दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात सीआरपीएफचे सहा जवान जखमी झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक स्थानिक नागरिकही या गोळीबारात जखमी झाला आहे. जखमी जवानांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे.
आमचे जवान जम्मूहून श्रीनगरला जात अशताना दहशतवाद्यांना त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात सहा जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात भर्ती केलं आहे अशी माहिती सीआरपीएफचे पीआरओ बी चौधरी यांनी दिली आहे. सध्याची वेळ संवेदनशील आहे. ‘फुटीवरतावाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. आम्ही हाय अलर्टवर असून सीआरपीएफ आपलं कर्तव्य पार पडत आहे’, असंही ते बोलले आहेत.