गोंदिया जि.प.मध्ये काँग्रेसच्या सभापती व राष्ट्रवादीच्या महिला जि.प.सदस्यामध्ये हाणामारी

0
16

जि.प.च्या इतिहासात पहिल्यांदाच हाणामारीचा प्रकार

गोंदिया,दि.३(berartimes.com)- जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज(दि.३)सर्वसाधारण सभेदरम्यान काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प.सदस्या श्रीमती सुनिता मडावी यांच्या झालेल्या बाचाबाची रुपांतरण मारहाणीत झाल्याची घटना घडली.
या घटनेत जि.प.सभापती यांच्या डाव्याहाताला तर श्रीमती मडावी यांच्याही हाताच्या बोटाला मार लागले आहे.दरम्यान दोन्ही पक्षांनी आपली तक्रार नोंदविली आहे.सभापती पी.जी.कटरे यांच्यानुसार जि.प.सदस्या मडावी यांनी आपल्यासमोरील टेबलावर माईक आपटल्याने काचेचे ग्लासचे तुकडे झाले.त्यानंतरही मारहाणीचा प्रयत्न करीत ओढताण केली आणि दुसराही माईक ओढला.तर जि.प.सदस्या मडावी यांचे म्हणने आहे की आपणास सभापतीने दिलेले बोगस प्रशासकीय मान्यतेचे पत्र परत करण्यासाठी गेले असता त्यांनी अरेरावी करीत अपशब्द वापरुन अंगावर ग्लासमधील पाणीफेकून ग्लास मारल्याचे सांगितले.श्रीमती मडावी यांनी घटना होताच गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली.तर सभापती पी.जी.कटरे हे जिल्हा सामान्य केटीएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
सविस्तर असे की,जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज सोमवारला दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती.ती सभा दुपारी अडीच वाजता सुरु झाली.सभा सुरु होताच पाणीपुरवठा व टंचाईच्या विषयाला घेऊन तसेच मागील कार्यवृत्तावर चर्चा सुरु करण्यात आली.त्याचवेळी मध्येच काँगेसच्या जि.प.सदस्या श्रीमती सिमा मडावी यांनी त्यांचे शिक्षक असलेल्या पतीच्या स्थानांतरणांचा मुद्दा उपस्थित केला.त्यात काही सदस्यांनीही शिक्षण विभागाचे मुध्दे उपस्थित केले,यावर शिक्षणाधिकारी हे उत्तर द्यायला लागले.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य कैलास पटले यांनी आपण गेल्या १० महिन्यापासून खोब्रागडे या शिक्षकाची बदली झाल्याने त्याठिकाणी पदवीधर शिक्षक का देत नाही आदी प्रश्न उपस्थित करण्यात येते परंतु त्याकडे अध्यक्ष कानाडोळा का करतात, लक्ष का देत नाही.जिल्हा परिषद झोलबा पाटलाचा वाडा नाही तर आमचे प्रश्न का एैकुन घेतले जात नाही अशी भावना व्यक्त केली.त्यावर लगेच सभेच्या अध्यक्ष असलेल्या जि.प.अध्यक्षा उषा मेंढे यांनी आक्षेप घेतला.आणि पटले यांनी जि.प.ला झोलबा पाटलाचा वाडा म्हटल्याने दिलगिरी व्यक्त करावी असे म्हटले.त्यावर जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी पटले यांच्या भावना योग्य असल्याने दिलगिरीचा प्रश्न येत नसल्याचे म्हणताच सभा जेवणासाठी स्थगित करण्यात आली.४ वाजे स्थगित करण्यात आलेली सभा सायकांळी सहा वाजता सुरु झाली.सभा सुरु होताच काँग्रेसच्या जि.प.सदस्या उषा शहारे यांनी पटले यांनी सभागृहाची माफी मागावी हा मुद्दा उपस्थित करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यानी विरोध करीत असे असेल तर सभेवर बहिष्कार घालत असल्याचे सांगत बाहेर निघत असतानाच तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जि.प गटाच्या सदस्या सुनिता मडावी या सभापती पी.जी.कटरे यांना त्यांनी दिलेले शाळा आवारqभंत बांधकामाच्या बोगस प्रशासकीय मान्यतेचे पत्र परत करण्यास गेल्या असता त्यांची सभापतींशी बाचाबाची झाली.या बाचाबाचीमध्ये श्रीमती मडावी यांनी माईक मारल्याने ग्लास फुटल्याचे सांगण्यात येत आहे.तर मडावीकडून मात्र सभापतींनी आपल्याला ग्लास मारल्याचे सांगितले जात आहे.या सर्व प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे जि.प.पदाधिकारी व सदस्य मात्र काँग्रेसच्या सभापतीला राष्ट्रवादीच्या सदस्यानेच मारहाण केल्याचे सांगत आम्ही सभापती सोबत असल्याचे म्हणने आहे.त्यामुळे खरे काय व कोण खोट व खरे बोलत आहे हे मात्र स्पष्ट होत नाही.
सीईओचां भ्रमणध्वनी बंद
या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यालयीन क्रमांकासह भ्रमणध्वनीवरही केला.परंतु त्यांनी आपला भ्रमणध्वनी बंद ठेवल्याने वास्तविकता काय हे त्यांच्याकडून कळू शकले नाही.

घटनेच्यावेळी मी नव्हतो-डेप्युटी सीईओ पुराम
जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागातंर्गत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येते.या सभेचे सचिव सुध्दा सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओच असतात.आजची घटना जेव्हा घडली त्यावेळी प्रत्यक्षात काय घडले हे जाणून घेण्यासाठी डेप्युटी सीईओ राजकुमार पुराम यांना विचारणा केली असता आपण त्यावेळी सभागृहाबाहेर होतो.परंतु सीईओ साहेब प्रत्यक्ष होते असे सांगत घडलेल्या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देत अद्याप प्रशासकीय स्तरावर कुठलीही तक्रार पोलिसात दिली नसल्याची माहिती दिली.

या घटनेने आ.अग्रवाल मारहाण घटनेला मिळाला उजाळा
गेल्यावर्षी ९ एप्रिलला गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना भाजप नगरसेवकाने पत्रकारपरिषदेत मारहाण केली होती.त्या घटनेची आठवण जि.प.मध्ये आज पुन्हा काँग्रेसच्या सभापती सोबत झालेल्या मारहाणीने उजेळात आली.विशेष म्हणजे आ.अग्रवालांच्या मारहाणवेळी सभापती पी.जी.कटरे हे हजर होते आणि महिना सुध्दा एप्रिलचाच होता.

जि.प.सदस्य व कर्मचारी रंगले व्हिडीओ शुqटगमध्ये
या घटनेची व्हिडीओ रेकांर्डिंग करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य व काही कर्मचारी यांच्यात चढाओढ दिसून आली.जे व्हिडीओ चित्रण करण्यात आले आहे त्यामध्ये अनेक जि.प.महिला व पुरुष सदस्य घटनेचे रेकार्डिंग करण्यासाठी आपला मोबाईल घेत फिरतांना दिसून येत आहेत.