एकाच दिवशी 42 अधिकार्‍यांच्या बदल्या

0
25

मुंबई – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आपल्या राजवटीत बरीच वर्षे एकाच खात्यात आपापल्या मर्जीतील सनदी अधिकार्‍यांची नियुक्ती केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अशा अधिकार्‍यांना झटका देत एकाच दिवशी तब्बल ४२ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. अजित पवार यांच्या खास मर्जीतील असलेल्या अजय मेहता यांची ऊर्जा विभागातून बदली करण्यात आली आहे. २००५ पासून मिहान निर्मितीचे संचालक असलेले मेहता २००९ मध्ये महावितरणचे संचालक झाले. पाच वर्षे ते याच पदावर होते. शेवटी त्यांची बदली झाली ती सरकार बदलल्यानंतरच. त्यांना पर्यावरणचे अपर मुख्य सचिवपद देण्यात आले.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करून प्रशासनचे चक्र पालटून शासन गतिमान करण्यासाठी युती सरकारने हे पाऊल टाकले आहे. अजित पवारांशिवाय आपण कोणाला उत्तर देण्यास बांधील नाही, असा हुकूमशाही कारभार मेहतांनी चालवला होता. एखाद्या विषयाची माहिती घेण्याविषयी प्रसारमाध्यमांकडून विचारणा केली असता आपण काही सांगण्यास बांधील नसल्याचे त्यांचे उत्तर असायचे. मनुकुमार श्रीवास्तव, नितीन करीर, श्रीकांत सिंह, मेधा गाडगीळ, अश्विनी भिडे, मनीषा म्हैसकर या अधिकार्‍यांच्याही बदल्या झाल्या आहेत. फडणवीस सरकारच्या या धोरणामुळे अनेक अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
(कंसात आधीचे पद) एस. एस. झेंडे – मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा (हाफकिन), डॉ. एस. के. शर्मा – प्रधान सचिव सहकार, पणन व वस्रोद्योग (परिवहन), गौतम चटर्जी – अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन व बंदरे (केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत), सतीश गवई – प्रधान सचिव गृहनिर्माण (मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा), एस. एस. संधू – प्रधान सचिव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग (महसूल), राजेशकुमार – प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क (पाणीपुरवठा व स्वच्छता), ओ. पी. गुप्ता – व्यव. संचालक राज्य वीज वितरण कंपनी (महाव्यवस्थापक बेस्ट), जे. डी. पाटील – महाव्यवस्थापक बेस्ट (नियुक्तीच्या प्रतीक्षेत), एन. के. देशमुख – विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्वसन प्रकल्प (मुख्य कार्यकारी अधिकारी एसआरए), डी. टी. वाघमारे -नवी मुंबई पालिका आयुक्त (व्यवस्थापकीय संचालक राज्य कृषी विकास महामंडळ), पराग जैन – व्यवस्थापकीय संचालक राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळ (मुख्य कार्यकारी अधिकारी मेरिटाईम बोर्ड), आबासाहेब जऱ्हाड – शिक्षण आयुक्त; पुणे (नवी मुंबई पालिका आयुक्त), एस. चोकलिंगम – विभागीय आयुक्त, पुणे (शिक्षण आयुक्त), व्ही. व्ही. देशमुख – कृषी आयुक्त पुणे (विभागीय आयुक्त पुणे), उमाकांत दांगट – विभागीय आयुक्त औरंगाबाद (आयुक्त कृषी पुणे), संजीव जयस्वाल – ठाणे पालिका आयुक्त (विभागीय आयुक्त औरंगाबाद), असीमकुमार गुप्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी एसआरए (ठाणे पालिका आयुक्त), बिपीन श्रीमाळी – व्यवस्थापकीय संचालक राज्य विद्युत निर्मिती कंपनी (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीज पारेषण कंपनी), राजीवकुमार मित्तल – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीज पारेषण कंपनी (सदस्य सचिव प्रदूषण नियंत्रण मंडळ), आशीष शर्मा – जमाबंदी आयुक्त व संचालक; भूमी अभिलेख पुणे (व्यवस्थापकीय संचालक वीज निर्मिती कंपनी), सी.एन.दळवी – आयुक्त सहकार व निबंधक; पुणे (जमाबंदी आयुक्त), हर्षदीप कांबळे – व्यवस्थापकीय संचालक राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर (अध्यक्ष नागपूर सुधार प्रन्यास), श्याम वर्धने – नागपूर सुधार प्रन्यास अध्यक्ष (नागपूर पालिका आयुक्त), श्रावण हर्डीकर – नागपूर आयुक्त (मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन्नोती मिशन), पी. अनबालगन – सदस्य सचिव राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (सह मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी), सुधीर खानापुरे – मुख्याधिकारी म्हाडा (सहविक्रीकर आयुक्त), उदय चौधरी – मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा परिषद (मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा), व्ही. के. गौतम – प्रधान सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग (आयुक्त रोजगार व स्वयंरोजगार), श्यामकुमार शिंदे – आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (आयुक्त पशुसंवर्धन).