सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

0
23

मुंबई : राज्य शासनाचे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाले असून, यात राज्यातील आठ शिक्षिकांची निवड झाली आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी विशेष कार्य करणाऱ्या शिक्षिकांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी पुरस्कारांचे वितरण होईल. पुरस्कार विजेत्या शिक्षिका अशा – १) छाया ठाकूर, साहाय्यक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, उच्छेळी, जि.पालघर; २) चंदा गायकवाड, साहाय्यक शिक्षिका, जि.प. प्राथमिक शाळा, माळवाडगाव जि.अहमदनगर; ३) चंद्रभागा पुंजाजी तुपे; मुख्याध्यापक, जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, मोडाळे, पो. सांजेगाव, ता.इगतपुरी, जि. नाशिक, ४) वंदना सुनील माळवदे; साहाय्यक शिक्षिका, जि़ प़ प्राथमिक शाळा, कोकळे नं.१, ता. कवठेमहांकाळ, जि.सांगली, ५) अनिता खुशालराव जोगदंड; साहाय्यक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मुर्शदपूर, नवगण-राजूरी, ता.जि.बीड, ६) मंदाकिनी मोतिचंद दुरुगकर उपप्राचार्य, राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय, ता.जि. लातूर, ७) सीमा रवींद्र फडणवीस साहाय्यक शिक्षिका; दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, महाल, नागपूर आणि८)रजनी दीपकराव आमले, साहाय्यक शिक्षिका, गजानन महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, काँग्रेस नगर, अमरावती.