24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home Top News तुघलकाबादमध्ये वायूगळती, 59 विद्यार्थ्यांना बाधा

तुघलकाबादमध्ये वायूगळती, 59 विद्यार्थ्यांना बाधा

0
24
नवी दिल्ली, दि. 5 – राजधानी नवी दिल्लीतील तुघलकाबाद परिसरात शनिवारी (6 मे) सकाळी वायूगळतीची घटना घडली आहे. यामुळे घटनास्थळापासून जवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना याची बाधा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 59 विद्यार्थ्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.   माहितीनुसार, तुघलकाबादमधील राणी झासी सर्वोद्य कन्या विद्यालय परिसरातील ही घटना आहे. येथून काही अंतरावर असणा-या कंटेनर डेपोमधील एका ट्रकमधून वायूगळती झाली. यामुळे विद्यार्थ्यांना डोळे आणि घशामध्ये जळजळ होऊन त्रास सुरू लागला.