युवकांसह अधिकारी, पदाधिकारीही झाले स्वच्छता अभियानात सहभागी

0
13

गोरेगाव,दि.5 : अखिल विश्‍व गायत्री परिवाराच्या वतीने निर्मल गंगा जन अभियानातंर्गत स्वच्छता व जलस्रोत शुद्धीकरण कार्यक्रम २ मे रोजी गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. याअंतर्गत गायत्री परिवार व युवाशक्ती स्पोर्ट्स क्लब गोरेगावच्या वतीने पवन तलावावर स्वच्छता अभियान राबवून तहसीलदारासह नगरपंचायतचे मुख्याधिकारी व नगरसेवकांनी श्रमदान करून पवन तलावाला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा संकल्प केला.

युवाशक्ती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने १ जानेवारी २0१७ पासून दर आठवड्याच्या प्रत्येक रविवारी या तलावावर स्वच्छता अभियान राबविण्यात येते. मागील १८ आठवड्यांपासून सलग येथे स्वच्छता अभियान स्वयंप्रेरणेने गोरेगाव येथील युवक आशिष बारेवार यांच्या नेतृत्वात करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार, सुरेश जाधव, वनक्षेत्र अधिकार्‍यांना देण्यात आली. दरम्यान पवन तलावाच्या स्वच्छता व सुशोभीकरणासाठी मदत करण्याचे आश्‍वासन तहसीलदारांनी दिले. या तलावात राबिवण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानात २ मे रोजी तहसीलदार, मुख्याधिकारी व नगरसेवकांनी स्वत: श्रमदान करून इतरही नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. या अभियानात जीवनलाल येडे, गिरीधारी जमईवार, नरेन महाराज,योगेश गोधुले, रवी बोपचे, संजय घासले, पुरुषोत्तम साकुरे, प्राचार्य शेख, रवींद्र चन्ने, अरविंद जैस्वाल, राजू टेंभुर्णीकर, डॉ.येडे, रेवेंद्र बिसेन, मोरेश्‍वर कांबळे, हिरालाल रहांगडाले, हिदायत शेख,फतहसिंग सग्गू, संजय बारेवार व इतर सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन विकास बोरकर यांनी केले. स्वच्छता अभियानाच्या यशस्वितेसाठी युवाशक्ती व गायत्री परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले